आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी दिवसभर धडक मोहीम:धूलिवंदनात हुल्लडबाजी कराल तर कारवाई : गुप्ता

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी, धूलिवंदनाच्या सणानिमित्ताने शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात रविवारी दिवसभर धडक मोहीम राबवत १४ ठिकाणी कारवाई केली. दुसरीकडे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन करणारा व्हिडिओ प्रसारित केला. त्यात म्हटले आहे की, होळी, धूलिवंदन सण आनंदाने साजरा करा. मात्र, एखाद्या व्यक्तीने रंग लावण्यासाठी नकार दिला तर त्याला जबरदस्तीने लावू नका. नशा करून वाहने चालवू नका. ७ मार्च रोजी शहरावर पोलिसांची करडी नजर असेल. त्यासाठी विविध पथके पेट्रोलिंग, नाकेबंदीसह बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यामुळे कोणीही हुल्लडबाजी करू नये.

बातम्या आणखी आहेत...