आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढते वय आणि आरोग्य:सक्रिय लोकांच्या मेंदूमध्ये चांगले बदल होत असतात - तज्ज्ञांचे मत

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन रविवारी ८० वर्षाचे झाले. त्यामुळे ते दुसऱ्या कार्यकाळासाठी फीट राहतील का ? असा प्रश्न त्यांचे समीक्षक आणि डेमोक्रेटिक पार्टीचे अनेक नेते करत आहेत. बायडेन यांनी २०२४ची निवडणूक जिंकली तर ते दुसऱ्या कार्यकाळात ८६ वर्षाचे होतील. तज्ञांचे म्हणणे आहे की, ८० वर्षांनंतरही लोक सक्रिय राहत असेल आणि त्यांच्या आयुष्यात काही उद्देश असेल तर ते निरोगी राहू शकतात. ते त्यांचे काम चोखपणे करू शकतात. बुद्धिमत्ता, विवेक आणि अनुभव ही त्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात.

न्यूयॉर्क टाइम्सने ज्येष्ठांच्या आरोग्याविषयावरील दहा तज्ञांना पुढील सहा वर्षे राष्ट्रपीच्या वयाच्या माणसाची काय परस्थिती असेल? असे विचारले. या तज्ञांनी बायडेनवर उपचार केले नाहीत. तथापि, त्यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या वैद्यकीय अहवालातून आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

तज्ञांनुसार, बायडेनच्या बाजूने अनेक कारणे आहेत. ते खूप शिकलेले आहेत. अधिक सामाजिक संवाद आहे. त्यांच्या कामासाठी खूप विचार करावा लागतो. संशोधनानुसार, या सर्व कारणांमुळे म्हातारपणात होणाऱ्या स्मृतीभ्रंश सारख्या आजारापासून दूर राहता येते. या व्यतिरिक्त बायडेन विवाहित आहेत त्यांचे कौटुंबिक नाते घनिष्ठ आहेत. ते सिगारेट किंवा दारू पीत नाहीत. आठवड्यातुन पाच दिवस व्यायाम करतात. कोलंबिया विद्यापीठात ज्येष्ठ आणि आराेग्य धाेरणाचे प्रोफेसर डॉ. जॉन रो यांच्या मते, ८० वर्षांचा सरासरी गोरा माणूस आणखी आठ वर्षे जगू शकतो. सक्रिय लोकांचे मेंदू चांगले काम करतात, असे तज्ञ म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...