आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भेंडेगाव पाटीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा ताफा आडवला, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • राठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली

औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर भेंडेगाव पाटीजवळ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी ता. 29 सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा आडविला. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण देण्याची मागणी यावेळी केली. त्यानंतर यावेळी निवेदनही देण्यात आले.​राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने हिंगोली जिल्हयात दाखल झालेले जलसंपदामंत्री पाटील व सामाजिक न्यायमंत्री मुंडे हे सकाळी हिंगोली येथील पत्रकार परिषद आटोपून वसमतकडे निघाले होते.

त्यांचा ताफा भेंडेगाव पाटीजवळ आला असतांनाच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीष पाटील महागावकर, ज्ञानेश्‍वर माखणे, अलोक इंगोले, विजय डाढाळे, नितीन भोसले, अंकुश व्यवहारे, आदिनाथ भोसले, नाना पाटील, नटू भोसले, मुंजाजी जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाही दिल्या.

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आघाडी व युती सरकारने आरक्षणाबाबत मराठा समाजाची फसवणुक केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली

बातम्या आणखी आहेत...