आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांची वाचनाची सवय मोडली आहे. त्यांना पुन्हा पुस्तकाची गोडी निर्माण व्हावी, शाळेची गोडी निर्माण व्हावी, अभ्यास कंटाळवाणा वाटू नये या हेतूने शहानूरमियाँ दर्गा परिसरातील मयूरबन कॉलनीतील महागनरपालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेत आगळावेगळा प्रयोग सुरू केला आहे. इथे प्रत्येक शनिवारी गोष्टींची शाळा भरते. कधी शाळेतील ताई तर कधी विद्यार्थी छान-छान गोष्टी सांगतात. यामुळे गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कार असा आदर्श विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.
कोरोनाकाळात शाळा दोन वर्षे बंद होती. ऑनलाइन वर्ग होत होते. परंतु प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर लक्षात आले की, विद्यार्थ्यांची एकाग्रता राहिली नाही, त्यांची वाचनाची क्षमता कमी झाली आहे. चिडचिडेपणा वाढला आहे. त्यांना पुन्हा पुस्तकांमध्ये रमण्यासाठी वेगळे प्रयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खास “गोष्टींचा शनिवार’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक शनिवारी शाळेच्या ग्रंथालयातील तर काही भेट म्हणून मिळालेली गोष्टींची पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात येतात. ती पुस्तके पुन्हा जमा करून त्यातील त्यांना आवडलेली गोष्ट मुले त्यांच्याच वर्गमित्रांना सांगतात. एवढेच नाही तर त्या गोष्टीतून आपण काय शिकलो याची माहितीही विद्यार्थी देतात. या प्रयोगामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मदत होत आहे. मुलांसाठी गोष्टीतून शिकण्याचा आनंद वेगळाच असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.