आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत 15 हजार विद्यार्थी गाणार सामूहिक राष्ट्रगीत:स्वातंत्र्य, बलिदानाच्या जागृतीसाठी उपक्रम- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

9 ऑगस्टला औरंगाबादमध्ये 15000 विद्यार्थीचा सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर हा कार्यक्रम होईल. स्वातंत्र्य चळवळ आणि यामध्ये दिलेल्या बलिदानाची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

या कार्यक्रमात शालेय स्तरावरील तसेच महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. याबाबतच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

34 शाळा होणार सहभागी

सुनील चव्हाण यांनी सांगितले की या कार्यक्रमात 15000 विद्यार्थी या राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. 9 ऑगस्टच्या या कार्यक्रमात शहरातील 34 शाळा सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रगीत तसेच विविध देशभक्तीपर गीते गायली जाणार आहेत.

विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जवळपास 85 बसच्या माध्यमातून हे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांच्या बसच्या पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांची माहिती युवकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

रत्नागिरीमध्येही झाला कार्यक्रम

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरीत जिल्हाधिकारी असताना असाच भव्य कार्यक्रम केला होता तसाच पद्धतीने औरंगाबादमध्येही हा कार्यक्रम करण्यात येणार आहे, यामध्ये जनजागृती करणारे विविध पोस्टरही लावण्यात येणार आहेत, यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी विविध रंगाच्या टोप्या परिधान करणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीच्या सूचना शिक्षण विभागाला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...