आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यव्यापी आंदोलन:आदर्श शिक्षक समितीचे आझाद मैदानावर धरणे ; विविध मागण्यांकडे वेधण्यात आले लक्ष

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे १ नोव्हेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करून प्रलंबित असलेल्या २१ विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.संस्थापक दिलीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर राज्याध्यक्ष रामदास सांगळे, राज्य नेते अंकुश काळे, मुक्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा ते पाच या वेळेत आंदोलने करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व ग्रामविकासमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

जुनी पेन्शन योजना सुरू करणे, २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, मुख्यालय सक्ती करण्यात येऊ नये, राज्यातील उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, प्रशालेमधील वर्ग २ मुख्याध्यापक रिक्त पदे भरणे, सर्व अशैक्षणिक कामे बंद करणे आदींसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले आहे. आंदोलनाला औरंगाबाद येथील राज्य नेते के. सी. गाडेकर, राज्य सचिव अंजुम पठाण, दीपा देशपांडे, पुष्पा दौड, विष्णू गाडेकर, संतोष पा बरबंडे, किशोर बिडवे, बबिता नरवटे, अनुपमा मोतीयाळे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...