आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व नियोजन:औरंगाबाद जिल्ह्याच्या आठही आगारातून भाविकांच्या मागणीनुसार जादा बस धावणार

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहरातील मध्यवर्ती, सिडको आगारासह जिल्ह्यातील एकुण ८ आगारातून ६ ते १० जुलै दरम्यान एकूण १५० जादा बस सोडण्याचे नियोजन विभाग नियंत्रकांनी केले आहे. तसेच भाविक, पर्यटकांच्या संख्या आणि मागणीनुसार २४ तास बसेस सोडण्यात येणार आहेत. ४० ते ४५ प्रवाशांची संख्या झाले की, बस सुटेल. विशेष म्हणजे एखादा गावातून, वॉर्डातून भाविकांनी बसची मागणी केली तर त्यांना तेथूनच बससेवा उपलब्ध करून देण्याची हमी विभाग नियंत्रकांनी घेतली आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. खरीप पेरणी पूर्ण केली जात आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठु माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुर वारीला जाण्याची लगभग सुरु झाली आहे. काहींनी वारीत सहभाग घेऊन पंढरपुरकडे प्रस्थान देखील केले आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे जे भाविक वारीत जाऊ शकले नाहीत, अशा वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विठुरायाच्या दर्शनासाठी असे लाखो भक्तगण आतूर झाले आहेत. ज्यांना शारीरिक कारणांमुळे पायी वारीत सामील होता येत नाही, असे सर्व भाविक बस, खासगी वाहनातून प्रवास करतात. त्यासाठी ट्रक, टेम्पो, कार, ट्रॅव्हल्सची बुकिंग केली जात आहे. तर राज्य परिवहन महामंडळाकडून प्रत्येक विभाग प्रमुख, आगार व्यवस्थापकांना विशेष बस सोडणे, चालक व वाहकांच्या ड्युटी लावणे, वाहतुक निरीक्षक, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार औरंगाबाद विभागातून १५० बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण

कोरोना महामारीमुळे पंढरपुरची यात्रेला ब्रेक लागला होता. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असूनही यात्रा भरणार आहे. यासाठी गावा गावातून गत महिना भरापासून पायी वारकऱ्यांच्या दिंड्या हरी नामाच्या गजरात पंढरपुराकडे प्रस्थान केले आहे. तर पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साध्या हरिनामाचा गजराने आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने अधिक भर पडली आहे.

स्वतंत्र शेडची व्यवस्था

प्रवाशांच्या तुलनेत बसस्थानकांची संख्या अतिशय तोकडी पडत आहे. पंढरपुर वारीला जाणाऱ्या भाविकांची एकच गर्दी होणार असल्याने बस स्थानकात स्वतंत्र शेड उभारून बस सोडल्या जाणार आहेत. विनावाहक, वातानुकूलित बस सोडण्याबाबत देखील विचारविनिमय केला जात आहे.

सुरक्षा बंदोबस्त

बसमध्ये जागा पकडण्यासाठी जीवाची परवा न करता प्रवासी धावपळ करतात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. याचा विचार करून सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन महामंडळातर्फे केले जात आहे. वाहतुक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रवाशांची कोणतीच गैरसोय होऊ नये, यासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंढरपूरात जाण्यासाठी जसे स्वतंत्र शेड उभारण्यात आले तसेच तिकडून येण्यासाठी देखील पंढरपूरात स्वतंत्र ठिकाणी बस सोडण्याचा बंदोबस्त करण्यात आला आहे. येथून परत येण्यासाठी बस मिळेल.

जिल्ह्यातील आठ आगारातील संपर्क क्रमांक

आगार अधिकाऱ्यांचे नाव संपर्क क्रमांक सिडको, ल. वि. लोखंडे ८३२९८८१६७५, स. सु. सूर्यवंशी ७९७२१५३६९३मध्यवर्ती, संतोष घाणे ९४२००३१००३, ल. दि. शहा ७९७२८६०९२२पैठण, सुहास तरवडे ९५६१५६६४२१, ग. ल. मडके ९४२३७९२००७सिल्लोड, चव्हाण ८६६८७८४१५८, चव्हाण ७६६६१५१३१७वैजापूर, हेमंत नेरकर ९४२०६१५२८७, भा. खं. गरूड ८२०८३६०८७२कन्नड, भारती ८६६८४०४०२०, काळवणे ९८६०९८२८७२गंगापूर, जवळीकर ९७६५५३८४८४, गो. ज. पगारे ९६७३५४२५७६सोयगाव, हिलाल ठाकरे ९६६५६५७०१४, बागुल ९६३७९३६४७४

बातम्या आणखी आहेत...