आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाैतिक सुविधा:21 महाविद्यालयांच्या अतिरिक्त तुकड्या बंद ; नूतनीकरणाचा ठराव विद्या परिषदेत मंजूर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नो ग्रेड दिलेल्या ५५ पैकी २१ महाविद्यालयांच्या तपासणीत भाैतिक सुविधा, प्राचार्य, प्राध्यापक नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्या महाविद्यालयांची फक्त मूळ तुकडी सुरू ठेवून अतिरिक्त तुकड्या, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय सोमवारी विद्या परिषदेच्या बैठकीत घेतला आहे,विद्यापीठाने दर्जा वाढवण्यासाठी मूल्यांकनाची मोहीम हाती घेतली आहे. ४८० पैकी २१८ कॉलेजचे मूल्यांकन पूर्ण झाले. त्या २१८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण नूतनीकरणाचा पुरवणी ठराव विद्या परिषदेत मंजूर केला. १९ महाविद्यालयांवर कारवाई केली असून, उर्वरित ४ महाविद्यालयांची सुनावणी लवकरच होईल, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले.

ज्या महाविद्यालयांना पाच वर्षे झाली नाहीत, अशी ५५ महाविद्यालये शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी झाली नाहीत. त्यांना तपासून संलग्नीकरण नूतनीकरणासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. यापैकी २१ महाविद्यालयांची तपासणी पूर्ण झाली. दोन महिन्यांत प्राचार्य, प्राध्यापक नेमण्याच्या अटीवर त्यांना परवानगी दिली आहे. अतिरिक्त आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तुकड्या बंद केल्या आहेत.६५ वयापर्यंतचे प्राध्यापक प्राचार्य : निवृत्तीनंतर ६५ वयापर्यंतचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्राचार्य म्हणून नेमणूक करता येईल. मात्र, विद्यापीठाच्या कायद्यानुसार नेमणूक हवी. तरच परवानगी देऊ, असेही कुलगुरू म्हणाले.

त्या महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द
३४ महाविद्यालयांना वारंवार सांगूनही तपासणी करून घेतलेली नाही. समित्यांना बोलावले नाही. त्यांनी सात दिवसांच्या आत समित्यांना बोलून तपासणी करून घ्यावी. अन्यथा त्यांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येईल, असेही कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...