आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिसांच्या हेल्पलाइन डायल ११२ वर गुरुवारी सायंकाळी ६:२५ मिनिटांनी कॉल प्राप्त झाला. बीड बायपास परिसरातील हिवाळे लॉन्सच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार खेळला जात आहे. टेबल व इतर सर्व सुविधा पुरवल्या जात असून माझे नाव कृपया गोपनीय ठेवावे, अशी विनंती करून त्याने कॉल कट केला. त्याची तत्काळ दखल घेतली. नियंत्रण कक्षाने ११२ वर कर्मचाऱ्यांना संपर्क साधला. मॅपमध्ये जवाहरनगरचे पोलिस गस्तीवर असल्याने त्यांना रवाना होण्याच्या सूचना केल्या. सातारा ठाण्याची हद्द असल्याने जवाहरनगर पोलिसांनी अधिकची कुवत पाठवण्यासाठी कॉल केला. ११२ चे कर्मचारी क्लबवर पोहोचले. मात्र, तोपर्यंत जुगाऱ्यांचा डाव अर्ध्यावर मोडला. त्यामुळे क्लबचालकापर्यंत माहिती पोहोचली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शहरातील काही क्लबकडे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची ‘सामंजस्य करारा’अंतर्गत डोळेझाक होत असल्याची चर्चा सुरू आहे.
पूर्वीच्या १०० क्रमांकाप्रमाणेच डायल ११२ ही हेल्पलाइन मदतीसाठी कार्यान्वित केली. त्यासाठी जीपीएस यंत्रणेवरील वाहनांवर स्वतंत्र कर्मचारी गस्तीवर असतात. प्राप्त कॉलनुसार डायल ११२ वाहन तत्काळ रवाना होते. अन् अर्ध्यावरती मोडला डाव : हा क्लब सातारा ठाण्याच्या हद्दीत असल्याने ११२ वरील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून ठाण्याचे डीओ अधिकाऱ्यांना कळवून अधिकचे कर्मचारी देण्याची विनंती केली आणि तेथेच गडबड झाली. सातारा पोलिसांसह ११२ वरील कर्मचारी पोहोचले खरे, मात्र तोपर्यंत पत्त्याचे कॅट अन् टेबल उरले होते. जुगारी मात्र पसार झाले होते. पोलिसांनी मात्र त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ करून त्याची नोंद केली. हा क्लब मालक चंदू पहाडी यांचा असल्याचे समोर आले. मात्र, त्यांनी रमी सोशल क्लब चालवण्याचा परवाना असल्याचे सांगितले.
साताऱ्याचे उपनिरीक्षक देविदास शेवाळे यांनी पंचनामा करत घटनास्थळी काहीही सापडले नसल्याचे त्यात नमूद केले. सदर हॉलमध्ये कन्नड कल्चर सेंटर नावाचे मोठे बॅनर पाहायला मिळाले, ज्यावर सोशल क्लब/कार्ड रुम्मी (सभासदाकरिता) मुंबई उच्च न्यायालय ऑर्डर १३९८ असा उल्लेख असून पॅन क्रमांक व जीएसटी क्रमांक नोंदवला. तो अधिकृत असल्याचा दावा मालकांनी केला. मग अधिकृत असेल तर सदस्य निघून का गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय तसा परवाना भेटला का, याबद्दल अधिकाऱ्यांनीदेखील नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.