आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक फड रंगला:अधिसभा निवडणूक : अभाविपकडून दहा युवा चेहरे; आठ जागा जिंकण्याचा दावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठ पदवीधर अधिसभा निवडणुकीत १० जणांचे अर्ज गुरुवारी दाखल केले आहे. यापैकी ८ जागा आम्ही नक्की जिंकू असा दावा पॅनल प्रमुख तथा मंचचे प्रदेश सचिव डॉ. गजानन सानप यांनी केला. डॉ. आंबेडकर पुतळा ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून अर्ज भरण्यात आले. नंतर पत्रकार परिषदेत डॉ. सानप यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

डॉ. सानप म्हणाले,‘राज्यपालांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणूूका घेण्याचे निर्देश दिले होते. पण कुलगुरू तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी विद्यापीठाची निवडणूक यंत्रणा आमदार चव्हाण यांच्या दावणीला बांधली. त्यांच्या इशाऱ्यावर निर्णय घेतले जात आहेत. सुटीच्या दिवशी अधिसभा निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला जातो. बुथनिहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जात नाही. बोगस मतदारांची नोंदणी केली गेली आहे. त्याची कुलगुरूंनी चौकशी केली पाहिजे.

पण त्यांच्यावर दबाव आहे. राज्यपालांकडे तक्रार केली आहे. आमदार चव्हाण हे विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा बनवू पाहत आहेत. त्यांनी धनदांडग्यांना मैदानात उतरवले आहे, असा आरोप डॉ. सानप यांनी केला. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, भाजप प्रदेश सचिव प्रवीण घुगे, डॉ. गोविंद काळे, डॉ. कालिदास भांगे, डॉ. देवराज दराडे, डॉ. भगवानसिंग डोबाळ, डॉ. सुरेश मुंडे, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. शिवाजी हुसे, मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील, प्राचार्य डॉ. सुहास मोराळे डॉ. राम बुधवंत, पंकज भारसाकळे आदींची उपस्थिती होती.

उमेदवारांमध्ये दोन महिला
माजी अधिसभा सदस्य डॉ. योगिता तौर, ॲड. सुनील जाधव, ॲड. आशिष नावंदर, अमर कदम आदींनी खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केले आहे. राखीव प्रवर्गातील भटक्या विमुक्तांमधून चंद्रकांत फड, अनुसूचित जमातीमधून गजानन डुकरे, इतर मागास प्रवर्गातून संतोष थोरात, अनुसूचित जातीमधून संजय गायकवाड, महिलांमधून ज्योती आसाराम तुपे आणि मोहमद आझरुदीन यांनीही अनुसूुचित जमातीतून नामांकन दाखल केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...