आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:अदिती लोणीकर हिचे शुक्रवारी अरंगेतरम

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे शिक्षण घेणारी अदिती लोणीकर हिच्या अरंगेतरमचा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमजीएमच्या रुक्मिणी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार राज्यमंत्री अतुल सावे, उद्योजक राम भोगले, सीएमआयएचे प्रसाद कोकीळ यांची उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

बातम्या आणखी आहेत...