आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीडीएस परीक्षा:यूपीएससीच्या सीडीएस परीक्षेमध्ये आदित्य गायकवाड देशात विसावा ; वडील लष्करात कर्नल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस-सीडीएस) परीक्षेत औरंगाबादच्या आदित्य गायकवाडने देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. जवळपास दोन लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातून आदित्यने यश मिळवले. आदित्यचे वडील विवेक गायकवाड हे भारतीय लष्करात कर्नल आहेत. भारतीय संरक्षण अकादमी-डेहराडून, भारतीय नौदल अकादमी एझिमला-केरळ आणि वायुदल अकादमी हैदराबाद येथील प्रशिक्षण व अभ्यासक्रमासाठी यूपीएससीकडून सीडीएस परीक्षा घेतली जाते. पदवीनंतर ही परीक्षा देता येते. लेखी परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणीनंतर निवड करण्यात येते. यूपीएसीने २०२१ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल ३ जून रोजी जाहीर केला. आदित्यने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक.ची पदवी घेतल्यानंतर त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जर्मनीची स्कॉलरशिप मिळाली होती. परंतु वडिलांप्रमाणेच लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याने त्याने स्कॉलरशिप सोडून सीडीएस परीक्षेची तयारी केली. “कठोर परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नात मला हे यश मिळाले. नेव्हल पायलट होण्याची माझी इच्छा आहे,’ असे आदित्य म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...