आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:आदित्य ठाकरेंचा 15 जून रोजी अयोध्या दौरा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदीवरील भोंगे आणि आणि हनुमान चालिसा पठण या वादामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्याची घोषणा केली होती, राज यांनी आपला दौरा रद्द केला असला तरी आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली आहे. येत्या १५ जूनला ते अयोध्या येथे जाणार असून त्याच दिवशी ते शरयूतीरी आरती करणार आहेत, अशी माहिती सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी (ता. ५) दिली.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी काही शिवसेना नेते अयोध्येत जाऊन जाऊन तयारीचा आढावा घेणार आहेत. खासदार संजय राऊत स्वत: अयोध्येला जाऊन हा आढावा घेणार आहेत. आदित्य यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई असे १५ जण अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...