आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे यांची सपशेल माघार:सिल्लोड येथे परवानगी मिळूनही उद्या होणारी सभा रद्द, शेतीच्य बांधावर जात शेतकऱ्यांना भेटणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लाेड येथे ७ नाेव्हेंबर राेजी हाेणाऱ्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी सपशेल माघार घेतली आहे. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांची सभा हाेणार आहे. दाेघांच्या सभांना परवानगी देण्यावरून दाेन दिवस राजकारण तापले. मैदान बदलल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी आदित्य यांच्या सभेला परवानगी मिळाली हाेती, पण आता त्यांची सभा हाेणार नाही, ते शेतकऱ्यांची संवाद साधतील, असे शनिवारी जाहीर करण्यात आले.

७ नाेव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता सिल्लाेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शेतकरी व शिवसैनिकांशी आदित्य संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुदर्शन अग्रवाल यांनी दिली. बुलडाणा येथून शिवनामार्गे सायंकाळी चार वाजता लिहाखेडी येथे आदित्य आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतील. बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर सिल्लाेड शहरात शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यांच्यासाेबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड आदी उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...