आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंच्या सिल्लोडच्या सभेला परवानगी:सत्तारांच्या गढीत 7 नोव्हेंबरला शिंदे आणि ठाकरेंच्या पुत्रात रंगणार टस्सल

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्दुल सत्तारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. पण आदित्य ठाकरेंच्या सभेच्या परवानगीवरुन जो वाद सुरू होता त्यावर आता पडदा पडला असून आदित्य ठाकरेंची सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही सभांची टस्सल सिल्लोडमध्ये सात नोव्हेंबरला दिसणार आहे.

कुणाला मिळणार प्रतिसाद?

आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात लोकप्रियता कुणाला जास्त आहे तर आदित्य ठाकरे यांचीच ती जास्त वाटते. परंतु शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे येथे शिंदे गटाला भरभरून प्रतिसाद मिळणार यात शंका नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सभेला किती गर्दी जमणार हे लवकरच स्पष्ट होईल.

बायपासलगत सभेला परवानगी

आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी ​​​सिल्लोडमधील ​​​महावीर चौकात मुख्य रस्त्यावर परवानगी पोलिस प्रशासनाकडे मागितली होती. परंतु ऐन रस्त्यात सभा टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने बायपासलगत मोकळ्या जागेत आदित्य यांच्या सभेला परवानगी दिली आहे. मी शेतकऱ्यांना भेटीसाठी सिल्लोडला येणार आहे. माझी ती राजकीय सभा नसेल असे आदित्य ठाकरेंनी आज स्पष्ट केले.

शिंदेंची सभा शाळेच्या प्रांगणात

सात नोव्हेंबरला श्रीकांत शिंदे यांची सभा आहे. ती नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात आहे. संध्याकाळी चार वाजता त्यांची सभा होईल. मला कळाले की, आदित्य ठाकरेंची सभा बाजूलाच आहे. त्यांची सभेच्या परवानगीबाबत कुठलाही राजकीय अजेंडा नाही. त्यांना चांगली जागा नेमून द्यावी हे मी यंत्रणेनाल सुचविले आहे.

बातम्या आणखी आहेत...