आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:लोकनृत्य स्पर्धेत आदिवासी, लावणी, गोंधळ नृत्याने वेधले लक्ष

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूजतर्फे आयोजित लोकनृत्य स्पर्धेत आश्रमशाळा प्रथम, तर जि.प. शाळा रांजणगावने द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन वाळूजच्या सरपंच सईदा पठाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गरवारे कम्युनिटीचे संचालक सुनील सुतवणे, परीक्षक सुधीर बहिरगावकर, विक्रांत वायकोस, वाळूजचे केंद्रप्रमुख मिथिन चव्हाण, छावणी सेंटरचे प्रमुख रमाकांत रौताल्ले यांची उपस्थिती होती. स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गोंधळ, लावणी, भारूड, पोवाडा, आदिवासी नृत्य, पोतराज नृत्य, वासुदेव नृत्याचे सादरीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...