आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सखोल आढावा:प्रशासकांनी विचारले, बांधकाम परवानगीची इथे कोणती पद्धत?

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनियुक्त महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकताच स्मार्ट सिटी कार्यालयात नगररचना विभागाचा सविस्तर, सखोल आढावा घेतला. बांधकाम परवानगीची इथे कोणती पद्धत आहे, असाही तिरकस प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे अभियंते काही क्षण गडबडून गेले होते.

महापालिकेच्या अर्थकारणात नगररचना विभाग सर्वात महत्त्वाचा मानला जातो. एका बांधकाम परवानगी फायलीतून लाखो रुपयांची उलाढाल, वाटाघाटी होतात. काही अभियंत्यांनी परवानगी देण्याची स्वत:ची यंत्रणा (पद्धत) विकसित केली आहे. ही बाब लक्षात आल्यानेच डॉ. चौधरी यांनी तो प्रश्न विचारला असावा, असे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांनी शहरातील कोणत्या भागात अंदाजे किती टक्के भूखंड आरक्षित आहेत. मोक्याच्या जागेवरील आरक्षण, गुंठेवारीची परिस्थिती काय आहे, किती बांधकामे अधिकृत झाली आहेत, किती फायली अजूनही प्रलंबित आहेत, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, गुंठेवारीतून किती रक्कम मनपाच्या तिजोरीत जमा झाली आहे, असेही प्रश्न विचारल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...