आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास सोमवार पासून सुरुवात, पॉलिटेक्निकसाठी 52 आणि डीफार्मसाठी 53 सुविधा केंद्र

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रशिक्षण विभागांतर्गत दहावीनंतर तीन वर्षांच्या अभियंात्रिकी पदविका आणि बारावी नंतर औषध निर्माण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सोमवार दि. 10 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी देण्यात आली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जुलै महिन्या जाहिर करण्यात आला. यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निकालास विलंब झाला. निकालामुळे पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. आयटीआय आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर सीईटी आणि नीट परीक्षेसंबंधीचे निर्णय न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आहे. तर दहावी नंतर अभियांत्रिकी पदविका आणि बारावीनंतर औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठीची प्रवेश नोंदणी सोमवार दि. 10 ऑगस्ट पासून सुरु होईल. तर 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी राज्यात 341 सुविधा केंद्र आणि औषध निर्माण अभ्यासक्रमासाठी 248 सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागासाठी अभियांत्रिकी पदविकेसाठी 52 आणि औषण निर्माण पदविकेसाठी 53 सुविधा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तर औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्हयातील शासकीय व तंत्रनिकेतनांच्या प्राचार्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

कोविड-19 संबंधीचे नियम पाळा

दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विद्यार्थी सुरक्षेसाठी सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे तसेच सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यासाठी शासकीय आणि अनुदानित संस्था या ई-सुविधा केंद्र म्हणून काम करतील हे पहावे.

> ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सुविधा केंद्रावर प्रत्यक्षपणे येऊन कागदपत्रांची तपासणी करु शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

उत्तीर्णतेच्या निकषात बदल

दरम्यान प्रवेशासाठी यंदा महाराष्ट्र राज्यातून आठवी, नववी आणि दहावी उत्तीर्ण असण्याची पात्रता अट आता बदलण्यात आली आहे. यावर्षी राज्यातून केवळ दहावी उत्तीर्णच विद्यार्थी पात्र राहतील.

जात वैधता प्रमाणपत्र नोंदणी करतांना आवश्यक नाही. अर्ज नोंदणी करतांना राज्याबाहेर जसे की, जम्मू कश्मिर संघ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शुल्क चारशे रुपये असून, महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी व दिव्यांगांसाठी अर्जाचे शुल्क तीनेश रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...