आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश:अपंगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र नसेल तरी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश द्यावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दवि्यांग कोट्यातून प्रवेशपात्र विद्यार्थिनीला विहित नमुन्यात दवि्यांगत्व प्रमाणपत्र नसल्याने प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. तिच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी अपंगत्व प्रमाणपत्र ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असेल तर ते किंवा आता ज्या नमुन्यात उपलब्ध आहे ते स्वीकारून शक्यतो लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दवि्यांग कोट्यातूनच प्रवेश द्यावा, असे आदेश दिले.

लातूर येथील जान्हवी झांबरे हिने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेचे गांभीर्य लक्षात घेता ती लगेच सुनावणीस घेण्यात आली. जान्हवी हिने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ४६८ गुण प्राप्त केले होते. तिला सक्षम अधिकाऱ्यांनी ४६ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. तिने हे प्रमाणपत्र आणि आवश्यक सर्व कागदपत्रांसह वैद्यकीय प्रवेशासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे अर्ज केला. ती प्रवेशासाठी महाविद्यालयात हजर झाली असता, तिचे दवि्यांगत्व प्रमाणपत्र विहित नमुन्यात नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला. या निर्णयाविरोधात तिने खंडपीठात याचिका दाखल केली. तिच्यासाठी वैद्यकीय प्रवेशाची अंतिम मुदत चार डिसेंबर असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती खंडपीठाने उपलब्ध प्रमाणपत्र स्वीकारून प्रवेश देण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...