आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश:स्थलांतरित झालेेले 82 विद्यार्थी शिक्षकांमुळे पुन्हा शाळेच्या प्रवाहात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात स्थलांतरित झालेले अनेक कामगार परत आलेले नाहीत. तर कामाच्या शोधात असलेले ऊसतोड मजुर, कामागार देखील मुला-बाळांसह स्थलांतरित होतात. अशा एकूण 82 मुलांना शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे.

शहरालगत असलेल्या 15 किलोमीटर जवळील वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बालरक्षक मोहीम ही मुलांसह स्थलांतरित होणाऱ्या पालकांसाठी शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यात औरंगाबादमधील शिक्षक आणि बालरक्षक यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील विविध ऊस तोडणीच्या ठिकाणी स्थलांतरीत बालकांचा शोध घेतला त्यात 36 व वडगाव कोल्हाटी येथील जि.प. शिक्षकांनी परराज्यातुन स्थलांतरीत झालेले 46 अशा एकूण 82 स्थलांतरीत मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

ऊसतोड मजूर, दगडखान मजूर, वीटभट्टी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार आदींचे व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या स्थलांतरात कुटुंबीयांबरोबर मुले देखील स्थलांतरित होत असतात. या स्थलांतरित मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन ते अठरा वयोगटातील मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे हंगामी स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबाद जिल्हयात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

या सर्वेक्षणात जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होणारे विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्ह्यात येणारे स्थलांतरित विद्यार्थी यांची नोंद घेतली जात असुन स्थलांतरित विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागात गेले तरी त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळावा व शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली असून, त्याद्वारे स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहता येणार आहे.

याच अंतर्गत नेवासा तालुक्यातील मंगळापुर येथील 8 , घोगरगाव, काष्टी व श्रीगोंदा तालुक्तयाील चिंगळा येथील 20 व नेवरगाव येथील 8 असे एकूण 36 विद्यार्थी बालरक्षक पथकाला परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास यश मिळाले.

या पथकात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गटशिक्षणाधिकारी एस.एम. गंडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक यांचा समावेश होता. मुलांच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सचिन वाघ, विद्या सोनोने, सोनाली निकम, मंगला गाडेकर, सुवर्णा शिंदे, अनिता राठोड आदींनी परिश्रम घेतले. या स्थलांतरित बालकांत राजकोट, सुरत, लखनौ या दुसऱ्या राज्यातून, जालना, परभणी, बीड,बुलढाणा येथून तसेच जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर तालुक्यातील बालकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...