आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इंजिनिअिरंगच्या 8816 जागांसाठी प्रवेश सुरू

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यातील २७ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. प्रथम वर्षाच्या एकूण ८,८१६ जागा आहेत. ४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतील. १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, तत्पूर्वीच म्हणजे १ नोव्हेंबरला सर्व कॉलेजांच्या शिकवणीला सुरुवात होईल.

पीसीएम आणि पीसीबी ग्रुपसाठी सीईटी सेलने ५ ते २० ऑगस्टदरम्यान रोज दोन सत्रांत ऑनलाईन सीईटी घेतली होती. पैकी अभियांत्रिकीसाठी पीसीएम ग्रुपच्या राज्यातून २,३१,२६४ जणांनी परीक्षा दिली होती. याचा निकाल १५ सप्टेंबरला लागला. आता अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाला सुरुवात झाली आहे. सीईटी सेलने २१ सप्टेंबरला वेळापत्रक जारी केले. आता बीई, बीटेकच्या प्रथम वर्षासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. एकूण २७ दिवसांचा हा प्रवेशोत्सव आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यादरम्यान, ३ कॅप राउंड, समुपदेशन फेरी होईल. पहिली तात्पुरती यादी ७ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यावर आक्षेपासाठी ८ ते १० ऑक्टोबरची मुदत आहे. या फेरीची पहिली गुणवत्ता यादी १२ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. त्यानंतर पहिला कॅप राऊंड १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल.

दुसऱ्या फेरीचे रिपोर्टिंग ९ नोव्हेंबरपर्यंत
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया २८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता सुरू होईल. २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान त्यांना सीट्सचे अलॉटमेंट होईल. त्यानंतर २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करावे लागेल. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी १ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. त्यानंतर लगेच २ ते ४ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन सबमिशन करावे लागेल. या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी ६ नोव्हेंबरला संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. ७ ते ९ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजात जाऊन रिपोर्ट करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...