आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजगार, उद्योगाची संधी देणारी तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात १०वी उत्तीर्ण झालेल्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, दहावीच्या गुणांवर प्रथम वर्षास व बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षास प्रवेश दिला जातो. रेल्वे, संरक्षण दल, आरटीओ, भेल, महावितरण, दूरसंचार, पाटबंधारे, तंत्रशिक्षण आदी सरकारी, निमसरकारी क्षेत्राबरोबरच वाढत्या उद्योग जगतात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच बीटेक, बीई, आर्किटेक्चर, बीएस्सी व्होकेशनल, बीबीए आदी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. गेल्या वर्षी मराठवाड्यातील ११३० जणांची निवड परिसर मुलाखतीने झाली, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे यांनी दिली. औरंगाबाद विभागात ५७ शासकीय, अशासकीय तंत्रनिकेतने असून त्यांची प्रवेश क्षमता १५,०४० आहे. शहरी, ग्रामीण भागात ५० प्रवेश सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नोंदणी अर्ज भरण्याची मोफत सुविधा आहे. सविस्तर माहिती, प्रवेश नोंदणी अर्जासाठी https://poly22 dte.maharashtra.gov.in/diploma22/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४० -२३३४२१६, २३३४७६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.