आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड व परिचर्या प्रशिक्षण केंद्र लोखंडी सावरगाव येथे एएनएम आणि जीएनएमच्या १२० प्रशिक्षणाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात एएनएमसाठी जिल्हा रुग्णालय बीडच्या ४०, एएनएम परिचर्या प्रशिक्षण केंद्र लोखंडी सावरगावसाठी ४०, जीएनएमच्या ४० अशा एकूण १२० जागा आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १७ वर्षांपेक्षा कमी व ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर आहे.
गुणवत्ता व मुलाखत यादी २८ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. कागदपत्रांची तपासणी २९ व ३० डिसेंबर रोजी होईल. निवड यादी व निवड पत्र ६ जानेवारी रोजी देण्यात येतील. उमेदवारांना प्रशिक्षणासाठी ९ जानेवारी रोजी हजर राहावे लागेल. एएनएमकरिता प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ४००, तर मागास प्रवर्गासाठी २०० रुपये आकारले जाईल. जीएनएमकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५००, तर मागास प्रवर्गासाठी २५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून गेल्यास एएनएम प्रशिक्षणार्थींना २५ हजार तर जीएनएम प्रशिक्षणार्थींना ५० हजार रुपये भरावे लागेल, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.