आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रता:‘नीट’ऐवजी पीसीबी गुणांवर मिळणार नर्सिंगला प्रवेश ; बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून परिपत्रक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिचर्या (परिचारक व परिचारिका) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता परीक्षेतील (नीट) गुणांची अट आता रद्द करून आता बारावीत ४५ टक्के गुणां (पीसीबी ग्रुप आणि इंग्रजी उत्तीर्ण) च्या आधारे बीएसस्सी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने घेतला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर हा निर्णय घेतल्याने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खासगी नर्सिंग स्कूल अ‍ँड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनचे राज्य सचिव शंकरराव आडसूळ यांनी केले आहे.

भारतीय परिचर्या परिषदेने परिचर्या (परिचारक व परिचारिका) अभ्यासक्रमासंदर्भात दोन परिपत्रके काढली होती. यात नीटमधील गुणांची अट प्रथमच लागू केली होती. भारतीय परिचर्या परिषदने ५ जुलै २०२१ रोजीच्या अध्यादेशानुसार परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीत पीसीबी ग्रुपमध्ये ४५ टक्के गुण व इंग्रजी विषयात पात्रता ठरवली होती.

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने घेतला निर्णय परिषदेने ८ एप्रिल २०२२ रोजीच्या नोटिफिकेशननुसार वरील पात्रता परीक्षेमध्ये ५० टक्के गुणांऐवजी ५० पर्सेंटाइल सर्वसाधारण, तर ४५ पर्सेंपटाइल एसटी, एससी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट घालून दिली होती. असे असतानाही नीट-यूजी माहितीपत्रक २०२० मध्ये परिचर्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता परीक्षेत (नीट) ५० टक्के गुणांची अट केली होती. या अटीस आव्हान दिले हाेते. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार आता सीईटी सेलने बारावीच्या पीसीबी गुणांच्या आधारावर बीएस्सी नर्सिंगला प्रवेश देण्याचे परिपत्रक परीक्षा सेलने काढले आहे.

बातम्या आणखी आहेत...