आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासत्र न्यायालयामार्फत मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत १ सप्टेंबर २०२२ पासून बदल करण्यात आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. देशभरात नवीन बदलानंतर ४२७ बालकांना दत्तक देण्यात आले. देशाबाहेरील ७६ नागरिकांनी भारतामधून मुले दत्तक घेतली. महाराष्ट्रात दत्तक प्रक्रियेचा कायदेशीर अधिकार असलेल्या ४६ संस्था केंद्रीयकृत पद्धतीने काम करतात. बाळ दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा यादी असून एक किंवा दोन राज्याचा पर्याय देता येतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर दत्तक मिळालेले बाळ काही कारणास्तव नाकारले तर पुन्हा प्रतीक्षा यादीचा आधार घ्यावा लागतो.
मूल दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण राष्ट्रीय स्तरावर स्थापन केले आहे. CARA च्या पोर्टलवर www.cara.nic.in या वेबसाइटवर अर्ज करता येतो. दत्तक देणारास बालकल्याण समितीच्या माध्यमातून सरेंडर डीड करावी लागते. समिती बाळाला शिशू केंद्रात ठेवते. साठ दिवसांत बाळाच्या आईचे मन परिवर्तन झाले तर ती पुन्हा घेऊन जाऊ शकते. साठ दिवसांनंतर बाळ मोफत दत्तक देण्यासाठी मुक्त केले जाते, त्यानंतर आईचा अधिकार संपतो. अठरा वर्षांखालील मुलगा-मुलीस दत्तक घेता येते. एकल महिला मुलगी अथवा मुलगा दत्तक घेऊ शकते, मात्र पुरुषाला अधिकार नाही. बाळ आणि दत्तक घेणारात २१ वर्षांचे अंतर हवे. विवाहित जोडपे लग्नाच्या दोन वर्षांनंतर दत्तक घेऊ शकते.
अशी आहे दत्तक प्रक्रिया दत्तक जाणाऱ्या मुलांचा डेटा तयार असतो. अर्जाद्वारे राज्यनिहाय पसंती द्यावी लागते. सोबत उत्पन्न, रहिवासी, जन्म आदी प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. पोलिस पडताळणी होते. सामाजिक कार्यकर्ते दत्तक घेणाराची त्याच्या घरी जाऊन माहिती घेतात व त्यांची मानसिक स्थिती जाणून घेतात.
बाळाला जगण्याचा हक्क जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळास जगण्याचा हक्क आहे. मूल बालकल्याण समितीकडे दिल्यास ओळख गुप्त ठेवली जाते. -अॅड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती औरंगाबाद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.