आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील:वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. बगनावत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा वकील संघाची शनिवारी निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदी अ‍ॅड. कैलास बगनावत ५६४ मते घेऊन विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. बाफना यांनी जाहीर केले. जिल्हा वकील संघाच्या १६ जागांसाठी ३१ जणांनी विविध पदांसाठी अर्ज ोदाखल केले होते.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दोन सभागृहात मतदान झाले. यात १,४५६ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सचिव पदासाठी अ‍ॅड. योगेश फाटके ४७८ मते घेऊन विजयी झाले. अॅड. भगवान दळवी सहसचिवपदी निवडून आले. त्यांना ९७५ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. सुरेश काळे हे ५११ मतांनी निवडून आले, तर महिला उपाध्यक्षपदी अॅड. ज्योती पत्की यांची बिनविरोध निवड झाली. वकील संघाच्या सदस्यपदी अॅड. दीपक अग्रवाल, शरद भदाणे, संदीप चव्‍हाण, उमेश दाभाडे, रामेश्वर हणवते, कल्पना जकाते, शेषराज मुळे, स्मिता नरके, कैलास पवार, विश्वनाथ शिंदे, अमितकुमार उदगे निवडून आले.

बातम्या आणखी आहेत...