आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्सचे अॅड. राजाराम मुळे अध्यक्ष

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्सच्या वर्ष २०२३ च्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. राजाराम बी. मुळे यांची तर सचिवपदी अॅड. युगांत आर. मारलापल्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अॅड. विनोद पवार, सहसचिवपदी अॅड. सीमा मालोद, कोषाध्यक्षपदी अॅड. राहुल विटेकर आदींची निवड करण्यात आली. सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी अॅड. अनिकेत मुंदडा, सचिवपदी अॅड. जयेश पाटील, सदस्यपदी अॅड. ज्ञानेश्वर देशमुख, अॅड. वैशाली सूर्यवंशी यांची निवड केली. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. सी. एम. पाटील, अॅड. सचिन डंख, अॅड. आनंद चावरे, अॅड. अमोल वाघमारे यांनी काम पाहिले. अॅड. राजाराम मुळे हे २५ वर्षांपासून, तर अॅड. मारलापल्ले सोळा वर्षांपासून कामगार न्यायालयात कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...