आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ)च्या वतीने आयोजित अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ याचे आज सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, उद्योगमंत्री उदय सामंत, कॅबिनेट मंत्री उदय सामंत, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आदी आठ मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित असतील.
औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांची ताकद जागतिक पटलावर मांडण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग विश्वातील नवीन प्रवाह, गुंतवणुकीच्या संधी आणि तंत्रज्ञान या विषयांवरील २२ चर्चासत्रे होणार आहेत. या प्रदर्शनास १ लाखांहून अधिक नागरिक भेट देणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे.
एक हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज २०२० च्या महाएक्स्पोत ५०० कोटींची उलाढाल झाली होती. यंदा हा पल्ला १ हजार कोटींपर्यंत नेण्याचे ध्याय ठेवल्याचे मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी सांगितले. या प्रदर्शनात रेल्वे विभाग, सीमेन्स, रॉयल एन्फील्ड, भारत फोर्ज, जेसीबी, आनंद ग्रुप, बजाज ऑटो, एन्ड्युरन्स, व्हेरॉक आणि संजीव ऑटो या कंपन्या सहभागी होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.