आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अधिसभा सदस्यांची कुलगुरूंकडे मागणी‎:काॅपी सेंटर काॅलेजांची‎ संलग्नता रद्द करावी‎

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी‎ परीक्षा गैरप्रकारावर ‘दिव्य मराठी’ने‎ वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे. यात‎ मासकॉपीसह अनेक प्रकारच्या‎ अनियमितता ‘दिव्य मराठी’ने‎ चव्हाट्यावर आणल्या आहेत.‎ त्यामुळे तीन नवनिर्वाचित अधिसभा‎ सदस्यांनी यासंदर्भात कुलगुरू डॉ.‎ प्रमोद येवले यांना सोमवारी (३‎ मार्च) निवेदन दिले आहे. सर्व‎ कॉलेजांची संलग्नता काढून‎ घेण्याची मागणी केली आहे.‎

२८ मार्चपासून श्रेयांक पद्धतीच्या‎ पदवी परीक्षांना सुरुवात झाली आहे.‎ पहिल्याच दिवशी कन्नड‎ तालुक्यातील हतनूरच्या राष्ट्रीय‎ कॉलेजमध्ये एका बेंचवर तिघे जण‎ बसवल्याचा प्रकार समोर आला‎ होता. त्यानंतर चापानेर येथील‎ चित्राई महाविद्यालयात भरारी‎ पथकाने भेट दिली, तर एका‎ गोडाऊनमध्ये परीक्षा सुरू‎ असल्याचे निदर्शनास आले होते.‎ त्याशिवाय एका इमारतीच्या छतावर‎ मंडप टाकून विद्यार्थ्यांची परीक्षा‎ घेतली जात होती. सिल्लोड‎ तालुक्यातीलही सावळदबारा,‎ पिंपळा व विझोरा गावामधील‎ परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती.‎ येथे तर भरारी पथकालाच प्रवेश‎ दिला जात नाही. कोळेवाडीत तर‎ फक्त जिवरख कॉलेजची पाटी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लावलेली दिसून आली. प्रत्यक्षात‎ परीक्षा २२ किमीवरील शाळेत‎ घेतल्या जात होत्या.

कुलगुरूंनी या‎ सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेऊन‎ या कॉलेजांची संलग्नताच काढून‎ घेतली पाहिजे. शिवाय चौकशी‎ समिती स्थापन करून इतरही‎ ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे.‎ त्याची सखोल चौकशी केली‎ पाहिजे. शेंद्रा येथील वाल्मीकराव‎ दळ‌‌‌वी कॉलेजच्या संस्थाचालकावर‎ तर गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी‎ मागणी अधिसभा सदस्यांनी केली‎ आहे. बामुक्टोतर्फे अधिसभेवर‎ निवडून आलेले डॉ. विक्रम खिलारे,‎ डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संजय‎ कांबळे यांनी निवेदन दिले आहे.‎

टपरीछाप कॉलेजच्या‎ व्यवहाराची चौकशी करा‎ टपरीछाप महाविद्यालयांचा‎ समाजावर गंभीर परिणाम होत आहे.‎ त्यांनी शिक्षणाचा ‘धंदा’ मांडला‎ आहे. नियमित प्राचार्य, शिक्षक,‎ आवश्यक सुविधा नसलेली‎ महाविद्यालये केवळ कौटुंबिक‎ चरितार्थासाठी उत्पन्नाची साधने‎ बनली आहेत. येथील उत्तीर्णांना धड‎ स्वत:चे नाव लिहिता येत नाही.‎ त्यामुळे कुलगुरूंनी दबावाला बळी‎ न पडता सर्व कॉलेजांच्या आर्थिक‎ व्यवहाराची चौकशी करावी.‎ -डॉ. विक्रम खिलारे,