आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:एमपीएससी परीक्षार्थींना ऐच्छिक पेपरमध्ये सविस्तर उत्तरे लिहिण्याची 10 वर्षांनी संधी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षांचे स्वरूप व संरचनेत बदल केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) २२ वर्षांनी नव्या पॅटर्ननुसार परीक्षा घेणार आहे. या परीक्षा आता यूपीएससीच्या धर्तीवर होणार आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या २९० जागांसाठी २०२३ मध्ये परीक्षा होतील. आयोगाने संकेतस्थळावर संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. ४१ संवर्गांची ही पदे आहेत. ४ जून २०२३ रोजी आता एकच पूर्वपरीक्षा होईल.

यासंदर्भात फेब्रुवारी २०२३ मध्ये सविस्तर अधिसूचना जारी केली जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या संरचनेत आता यूपीएससीप्रमाणे बदल केला आहे. एमपीएससीआधी पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेत होते. पण आता मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्हऐवजी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असणार आहे. मुख्य परीक्षा ३० सप्टेेंबर ते ९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होईल. ३० सप्टेंबरला मराठी आणि इंग्रजी भाषेत निबंध लेखनाची परीक्षा होणार आहे. १ ऑक्टोबरला भाषा पेपर-एक मराठी, भाषा पेपर-दोन इंग्रजी होणार आहे. ७ ऑक्टोबरला सामान्य अध्ययन-१, सामान्य अध्ययन-२ साठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ८ ऑक्टोबरला सामान्य अध्ययन ३, सामान्य अध्ययन-४ या दोन विषयांचा पेपर होईल. ९ ऑक्टोबला वैकल्पिक विषयावरील पेपर एक व दोन होतील. त्यानंतर मुख्य परीक्षा होतील.

आतापासून तयारी करणे योग्य राहील
कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी आदींसह विविध विषयांतून ऐच्छिक पेपर निवडण्याची परीक्षार्थींना संधी आहे. मात्र, हा पेपर सोडवताना रट्टा मारलेला अजिबात चालणार नाही. कारण उत्तरे विस्ताराने लिहावी लागतील. विश्लेषण, तुलनात्मक, क्रिटिकल विश्लेषण करावे लागणार आहे. त्यामुळे आत्तापासून तशी प्रॅक्टिस करावी लागेल.-सादिक बागवान, संचालक, प्री-आयएएएस कोचिंग सेंटर

आतापासून तयारी करणे योग्य राहील
कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी आदींसह विविध विषयांतून ऐच्छिक पेपर निवडण्याची परीक्षार्थींना संधी आहे. मात्र, हा पेपर सोडवताना रट्टा मारलेला अजिबात चालणार नाही. कारण उत्तरे विस्ताराने लिहावी लागतील. विश्लेषण, तुलनात्मक, क्रिटिकल विश्लेषण करावे लागणार आहे. त्यामुळे आत्तापासून तशी प्रॅक्टिस करावी लागेल.-सादिक बागवान, संचालक, प्री-आयएएएस कोचिंग सेंटर

मार्च ते सप्टेंबरदरम्यानच्या संभाव्य तारखा
१९ मार्च २०२३- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्वपरीक्षा, ८ जुलै- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा, ३० एप्रिल- महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २ सप्टेंबर- महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा, ९ सप्टेंबर- महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा मुख्य परीक्षांचे वेळापत्रक असणार आहे. पण फेब्रुवारी-२०२३ मध्ये याची अधिसूचना एमपीएससीकडून जारी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...