आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखाने बंद:7 कारखान्यांत 210 दिवस 28.39 लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपानंतर पट्टा पडला ; यंदा विक्रमी गाळप

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

या वर्षीच्या गाळप हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे प्रशासनासह सर्वांसमोर गंभीर समस्या उभी राहिली होती. परंतु गाळपास कार्यरत सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील संपूर्ण २८ लाख ६९ हजार मे. टन उसाचे विक्रमी गाळप करून साखर उत्पादनाचा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात आता या वर्षीच्या गाळप हंगामासाठी तोडणीस आलेल्या उसाचे एक टिपरूदेखील शिल्लक नसल्याने सोमवारी (दि.६) साखर कारखान्यांची चाके थांबली आहेत. मागच्या वर्षीच्या गळीत हंगामात जिल्ह्यात १८ लाख ३७ हजार ५६६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा १० लाख ३१ हजार ४३४ मे. टन उसाचे जास्तीचे ऊस उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर (सिल्लोड), संत एकनाथ सचिन घायाळ (पैठण), शरद (पैठण) या तीन सहकारी, तर बारामती अॅग्रो (कन्नड), छत्रपती संभाजीराजे (औरंगाबाद), मुक्तेश्वर (गंगापूर), घृष्णेश्वर (खुलताबाद) या चार खासगी अशा एकूण सात साखर कारखान्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच ऊस गाळपास प्रारंभ केला होता. या सातही साखर कारखान्यांनी अंदाजे २१० दिवस उसाचे गाळप केले. या वर्षी उष्णतेनेही उच्चांक ओलांडला होता. त्यामुळे मार्चनंतर ऊसतोड मजुरांनी फडातून काढता पाय घेतला होता. कारण ऊस तोडताना उन्हात मजुरांच्या अंगाची लाही लाही होते. कारण पाचटाच्या अनकुचीदारपणामुळे मजुराचे अंग चिरतात. त्यामुळे एप्रिलमध्ये उसाचे फड ओस पडायला सुरुवात झाली होती. अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. मजुराअभावी ऊसतोडणी थांबू नये म्हणून शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणी यंत्र मराठवाड्याकडे वळवली. तसेच उन्हामुळे साखरेच्या उताऱ्यात घट होऊन साखर कारखाने तोट्यात जातात म्हणून टनामागे दोनशे रुपये साखर कारखान्यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली. याचबरोबर मागच्या वर्षी रोहिणी नक्षत्रातच पावसाने हजेरी लावली होती. या वर्षी अद्याप पाऊस पडला नसल्याने ऊसतोडणी व वाहतुकीत अडथळा निर्माण झाला नाही. या सर्व घटनांचा योग जुळून आल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त ऊस कारखान्यांपर्यंत आला. त्यामुळे संत एकनाथ सचिन घायाळ कारखान्याचा सोमवारी (दि. ६) तर छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग व मुक्तेश्वर साखर उद्योगाचा रविवारी (दि.५) रोजी पट्टा पडला. गाळप हंगाम २०२१-२२ मधील अखेरचा ऊस साखर कारखाना क्षमता गाळप उत्पादन उतारा सिद्धेश्वर, सिल्लोड 2000 172000 182000 10.61 घायाळ (संत एकनाथ) 1250 290000 236000 8.13 शरद, पैठण 1250 201000 175000 8.73 बारामती अॅग्रो कन्नड 4200 1017000 1145000 11.25 छत्रपती संभाजीराजे 1250 414000 445000 11.05 मुक्तेश्वर, गंगापूर 2500 467000 487000 10.47 घृष्णेश्वर, खुलताबाद 2500 308000 322000 10.45 एकूण 2869000 2992000 10.44 गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख मे. टन अधिकचे गाळप दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह क्रशिंग चालू असताना साखर कारखान्याचे छायाचित्र. परिश्रम-नियोजनामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न आता सुटला गेल्या दोन वर्षांमध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे उसाखालचे क्षेत्र वाढले होते. ही परिस्थिती मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात सारखीच होती. तसेच काही कारखाने बंद असल्यामुळे चालू असणाऱ्या कारखान्यावर गाळपाचा जास्त भार पडला होता. त्यामुळे आमच्या समोरही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु परिश्रम व नियोजनामुळे प्रश्न सुटला. बाहेरून आणलेल्या हार्वेस्टरला स्वत:च्या तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी टनामागे स्वत:च्या खिशातून पंचाहत्तर रुपये अतिरिक्त दिले. -एन. टी. कुंजर, मुख्य शेतकी अधिकारी, मुक्तेश्वर शुगर मिल, गंगापूर

बातम्या आणखी आहेत...