आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणलोट क्षेत्रांत पावसाने पुन्हा वेग घेतला:तब्बल 31 वर्षांनंतर जुलै महिन्यात गोदावरी नदीपात्रात सोडले पाणी

पैठण23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची साठवण क्षमता १०२ टीएमसी असून यंदा या धरणाच्या निर्मितीनंतर तब्बल ३१ वर्षांनंतर जुलै महिन्यात गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे लागले. यंदा २५ जुलै रोजी धरण भरल्यानंतर २७ पैकी १८ मुख्य दरवाजांतून पाणी सोडले. सध्या १८ दरवाजे २ फुटांनी उंचावून नदीपात्रात ५ हजार ७५९२ क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. २५ जुलै ते आजपर्यंत तब्बल ८३ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाने पुन्हा वेग घेतला असून मागील चार दिवसांपासून जायकवाडी धरणात ५३०१४ क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे रविवारी तिसऱ्यांदा ५७ हजार क्युसेकच्या पुढे विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कुणीही नदीपात्रात उतरू नये असे आवाहन अभियंता अशोक चव्हाण यांनी केले आहे. मागील वर्षीही सलग दोन महिने सुरू होता विसर्ग : मागील वर्षीही जायकवाडीतून तब्बल दोन महिने सलगपणे १८ दरवाजांतून विसर्ग करावा लागला होता. त्या वेळीही ८६ टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले होते.

विष्णुपुरीचे पाच, लिंबाेटीचे दाेन दरवाजे उघडले नांदेड | चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडून ६९,७४५ क्युसेक विसर्ग करण्यात आला. तर, लिंबोटी धरणाचे दोन दरवाजे उघडून २६६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

धरणसाठ्याची सद्य:स्थिती ९६.८६ एकूण साठा ५३०१४ क्युसेक आवक

५७५९२ क्युसेक विसर्ग २१०२.८७१ जिवंत साठा १५२२.०० फूट ४६३.९०६ मीटर

बातम्या आणखी आहेत...