आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मनपाची 42 नंतर आता 74 कलमी योजना

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४२ कलमी योजनेनंतर आता ७४ कलमी योजना राबवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी बैठक घेऊन गळती थांबवणे, नवीन जलकुंभ बांधणे, अंतर्गत पाइपलाइनची गती वाढवण्याचा निर्णय घेतला. ही सर्व कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात ११ नवीन जलकुंभ बांधले जातील. १६८० कोटींच्या जल योजनेचे काम एमजेपीच्या माध्यमातून केले जात आहे. जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीने साडेसहा किमी पाइपलाइन टाकण्यासाठी पाइप खरेदीची ऑर्डर दिली होती. त्यानुसार पाइप दाखल होत आहेत. मात्र काम संथगतीने सुरू आहे. जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या फीडरलाइनवर १७०० नळ कनेक्शन तोडण्यासाठी तीन पथके स्थापन केली आहेत. त्यांनी आठवडाभरात काय कारवाई केली याचा दर दहा दिवसाला आढावा घेतला जाईल. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणात पंपहाऊस उभारण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी दिली.

हर्सूलचे पाणी पिण्यायाेग्यच, तरी पुन्हा चाचणी करू
हर्सूल तलावातील पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या हाेत्या. त्यावर हे पाणी पिण्यायोग्यच आहे. तरीदेखील पुन्हा एकदा चाचणी केली जाणार आहे. शिवाय हर्सूल तलाव पाणीपुरवठा योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे चाैधरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...