आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजनन:नाथसागरात 7 वर्षांनंतर दिसली युरोप, आशिया खंडातील शेंडी बदकांचा थवा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षिनिरीक्षण करताना मानद वन्यजीवरक्षक डॉ. किशोर पाठक यांना दुर्मिळ शेंडी बदक आढळले. याआधी जायकवाडी नाथसागर जलाशयावर पिंपळवाडी येथे २ बदक दिसले होते. यंदा २५ ते ३० शेंडी बदक दिसले. या वेळी मिलिंद गिरधारी, डॉ. मिलिंद आणि मानसी पटवर्धन उपस्थित होते.

शेंडी बदक हिवाळ्यात भारतात येणारे बदक आहे. युरोप आणि आशिया खंडातील काही देशांत दिसून येते. मूळ युरोप इथे प्रजनन करणारे हे बदक हजारो किलोमीटर दूरवरून आपल्या भागात अन्नाच्या शोधात येतात. मध्य आशिया आणि युरोप खंडात बर्फ पडल्यावर अन्नाचे दुर्भिक्ष झाल्याने हे बदक आपल्याकडे येतात. यांचे भक्ष्य पाण्यातील छोटे मृदुकाय प्राणी, जलकीटक, शैवाल, पान वनस्पतींचे बिया, कोंब आहेत.

शेंडी बदक याचे इंग्रजी नाव टफ्टेड पोचार्ड आहे. याचा आकार ४० सेंमी असतो. नर व मादी दिसायला भिन्न असतात. नर शेंडी बदकाचा रंग चमकदार काळसर असून स्पष्ट शेंडी असते आणि शरीराच्या दोन्ही बाजू पांढरट रंगाच्या असतात. मादी शेंडी बदकाचा रंग फिकट तपकिरी असून दोन्ही बाजू फिकट पांढरी असतात. मादीला पण शेंडी असते. मादीचे डोळे गडद पिवळे असतात. शेंडी बदक नेहमी समूहात राहतात, अशी माहिती डॉ. पाठक यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...