आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात एकीकडे भीषण पाणीटंचाई असताना दुसरीकडे सूतगिरणी चौकातील मुख्य नाल्यावरील जलवाहिनीला मात्र दीड महिन्यापासून गळती लागली होती. यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. स्थानिक नागरिक मनपा अधिकाऱ्यांना वारंवार या फुटलेल्या जलवाहिनीचे व्हिडिओ, फोटो पाठवून तक्रार करत होते. परंतु पाइपलाइन काही दुरुस्त होत नव्हती. अखेर १४ जून रोजी जाग्या झालेल्या मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन शहानिशा केली असता ही पाइपलाइन एमआयडीसीची असल्याचा खुलासा झाला. याबाबत मनपाकडून माहिती मिळताच मग एमआयडीसीने १५ जून रोजी गळती बंद केली. या भागातील रहिवासी किरण जैस्वाल म्हणाले, ‘आम्ही मागील दीड महिन्यापासून या गळतीबाबत तक्रार करत आहोत. शहरात पाण्याची भीषण समस्या असताना या पाइपलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया जात होते ते पाहून वाईट वाटायचे. प्रशासनाने ती पाइपलाइन लवकरात लवकर कायमस्वरूपी दुरुस्त करावी अशी आमची विनंती आहे.’ एमआयडीसीचे सहायक अभियंता अजय चन्ने म्हणाले, ‘आम्हाला मंगळवारी गळतीबाबत कळाले, लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तात्पुरती दुरुस्ती केली. आठवड्याभरात ती पाइपलाइन पूर्णपणे दुरुस्त करण्यात येईल.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.