आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात परतला:कोरोनाकाळात पॅरोलवर सुटल्यानंतर फरार खुनातील कैदी अटकेत

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्सूल कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भाेगणारा कैदी कोरोनाकाळात पॅरोल रजेवर सुटल्यानंतर फरार झाला हाेता. त्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. आरोपी शिवाजी गंगाधर बोराडे (रा. अंबेलोहोळ, ता. गंगापूर) असे त्याचे नाव आहे. कारागृह प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता तो त्याच्या शेतातच आढळून आला. सन २०१५ मध्ये बोराडेने खुन केल्याने गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्याला जन्मठेप व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, कोरोनाकाळात बंद्यांना पॅरोल रजा दिली जात हाेती. यादरम्यान बोराडेलाही १६ एप्रिल २०२१ रोजी ४५ दिवसांसाठी आकस्मिक रजा (पॅरोल) मंजूर केली होती.

मात्र, ४५ दिवस उलटूनही तो कारागृहात परतला नाही. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने १० नोव्हेंबर रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक एस. डी. आधाने, पोलिस नाईक संदिप घाडगे, सावंत सोहळे, सुरेश कचे यांनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा तो शेतात असल्याचे कळताच त्याला ताब्यात घेऊन कारागृहात रवाना केले.

बातम्या आणखी आहेत...