आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकवर्गणी:‘मिलिंद’नंतर आता अजिंठा वसतिगृहाची डागडुजी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचालित नागसेनवन येथील मिलिंद प्रशालेचे पुनर्वैभव मिळवून दिल्यानंतर आता अजिंठा वसतिगृहाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एक महिन्यापासून ही मोहीम सुरू आहे. तूर्त परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर लोकवर्गणीतून डागडुजी केली जाणार असल्याची माहिती डॉ. कैलासचंद्र बनसोडे यांनी दिली.

मिलिंद कला आणि मिलिंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी निर्माण केलेल्या अजिंठा वसतिगृहाची सध्या खूप दुरवस्था झाली आहे. या परिसरात प्रचंड अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य आहे. त्याशिवाय अजिंठा वसतिगृहाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मिलिंद प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनीही असेच मिलिंद शाळेला लोकवर्गणीतून नवी झळाळी दिली आहे. आता तोच कित्ता गिरवत दुसऱ्या एका ग्रुपने अजिंठ्याच्या पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले आहे. सध्या दोन ते तीन आ‌ठवड्यांपासून श्रमदान करून स्वच्छता केली जात आहे. या मोहिमेत मनपाच्या उपायुक्त नंदा गायकवाड, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक महेंद्र बनसोडे, डॉ. अनिल गायकवाड, सचिन डोल्हारे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता केली आहे.

बातम्या आणखी आहेत...