आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:सोळा लाख दिल्यानंतर समजले पैसे घेणारा शिक्षण संस्थाचालक नाही; एकावर गुन्हा

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा चालवण्यास घेण्यासाठी १६ लाख रुपये दिल्यानंतर पैसे घेणाऱ्याचा शैक्षणिक संस्थेशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले. विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे संचालक अफसर खान जुम्मा खान (७१) यांची विश्वनाथ माधव तरटे (रा. कमलेश हाऊसिंग सोसायटी) ने फसवणूक केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तरटेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अफसर खान यांनी आणखी एखादी इंग्लिश शाळा चालवण्यास घेण्याचे ठरवले. त्यांची २०१४ मध्ये तरटेसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख करून देताना गौतम ऋषी शिक्षण संस्था औरंगाबाद, अश्वघोष व व्यायाम प्रसारक मंडळ एन-१ सिडको या शिक्षण संस्थांचा मालक असल्याचे सांगितले. त्यामुळे अफसर यांनी त्यांच्याकडून एखादी इंग्लिश स्कूल चालवण्यास घेण्याची इच्छा असल्याची बोलून दाखवले होते. हे तरटेला कळताच त्यांचा विश्वास संपादित करून माझ्याकडे दोन शिक्षण संस्था आहेत. परंतु, कामाचा व्याप असल्याने तुम्ही चालवण्यास घेण्यास तयार असाल तर मी अध्यक्ष असलेली अश्वघोष शैक्षणिक व व्यायाम प्रसारक मंडळांची सिडको एन-१ औरंगाबाद येथील स्प्रिंगडेल इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा तुम्हाला चालवण्यास देऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर स्प्रिंगडेल इंग्लिश स्कूल चालवण्यास घेण्याचा व्यवहार २१ लाखांत ठरला होता.

व्यवहारानंतर तरटेने तोडला संपर्क
शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून दोन टप्प्यात बारा आणि चार असे एकूण सोळा लाख त्यांनी तरटेला दिले. करारानुसार स्प्रिंग डेल शाळा हिना शैक्षणिक व कल्याण संस्था औरंगाबाद यांना हस्तांतरित करण्याचे ठरले होते. मात्र, व्यवहारानंतर तरटेने संपर्क तोडला. आज-उद्या असे म्हणत त्याने टाळले. अफसर खान यांनी अश्वघोष शैक्षणिक व व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेबाबत खात्री केली. तेव्हा तरटे हा संस्थेचा अध्यक्ष नसल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...