आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • After Ten In The Morning, Give Farewell To Father, Give Along With Dahipohe dahipadachi Shidori; Fertilize The Plant, Add To The Trees, Do The Renovation| Marathi News

आज विसर्जन:सकाळी दहानंतर द्या बाप्पांना निरोप, सोबत द्या दहीपोहे-दहीभाताची शिदोरी; निर्माल्याचे करा खत, झाडांना घाला, करा नवनिर्माण

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांच्या उत्सवानंतर आज गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. घराघरात व सार्वजनिक मंडळात विराजमान झालेल्या मूर्तींचे सकाळी १० नंतर विसर्जन करता येईल. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा आग्रहपूर्वक निरोप देताना बाप्पांसोबत दहीपोहे किंवा दहीभाताची शिदोरीही द्या. दहा दिवस साचलेले निर्माल्य पाण्यात किंवा इतरत्र न टाकता झाडांना खत म्हणून घाला. यातून नवनिर्माण होईल, अशी माहिती अनंत पांडव गुरुजी यांनी दिली.

पुढच्या वर्षी लवकर या : गणपतीला लवकरात लवकर पुढील वर्षी येण्याचे आवाहन करावे. विसर्जनाला घेताना गणपती ज्या जागेवरून उचलला आहे त्या जागेवर अक्षता, सुपारी ठेवावी. विसर्जनाला जाताना श्रींच्या मूर्तीसोबत सोबत शिदोरी म्हणजेच दहीपोहे किंवा दहीभात द्यावा. शाडू मातीच्या गणपतीचे विसर्जन : शाडू मातीच्या पार्थिव गणेशाचे विसर्जन घरी करावे. त्यानंतर पाण्यात जी माती राहील ती आपल्या घरातील कुंड्यांमध्ये घालू शकता. दहा दिवसांमध्ये जमा झालेले निर्माल्य इतरत्र कोठेही फेकू नये. कोणाच्याही पायदळी येऊ नये अथवा साठवणीच्या पाण्यामध्ये टाकू नये. त्याचे योग्यरीत्या खत करून झाडांना घातल्यास अत्यंत फायदेशीर ठरेल.

गणपतीची रोजच्याप्रमाणे पूजा-आरती करावी. त्यात सर्वप्रथम अक्षता वाहून आवाहन करावे. पंचोपचार पूजन म्हणजेच ध्यान आवाहन करावे. मूर्तीवर पाणी शिंपडावे, पंचामृत थोडे शिंपडावे (शुद्धोदक) चांगले पाणी शिंपडून हात जोडून गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर मूर्तीला अत्तर लावावे. गंध, अक्षता, हळदी-कुंकू वाहून दूर्वा, शमी, आघाडा, अर्पण कराव्यात. धूप-दीप दाखवून आरती करावी. नंतर गणपतीची मनोभावे क्षमायाचना करावी.

बातम्या आणखी आहेत...