आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोओलिस:नारायण राणेंच्या अटकेनंतर राजकीय तक्रारींमुळे पोलिसांचा वाढला ताण, दाखल करावे लागतायत रोज नवे गुन्हे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिनाभरातील इतर राजकीय गुन्हे वगळता राणे अटकनाट्यानंतर राज्यात जणू एकमेकांविरोधात राजकीय गुन्हे व तक्रारी दाखल करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.

यात भरडले जाताहेत ते पोलिस. इतर गुन्ह्यांचा तपास लावतानाच राजकीय बंदोबस्त आणि राजकीय स्टंटबाजीनंतर नोटीस तयार करणे, बजावणे, घटनास्थळी असलेल्यांची नावे शोधणे, सीसीटीव्ही फुटेज चाचपडून खात्रीनंतर कारवाईसाठी पोलिसांना दिवस-रात्र मेहनत घेत पळापळ करावी लागते आहे.

नाशिक : शिवसेना-भाजप राडा, १८३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
- राणेंच्या अटकेनंतर शहरात सेना व भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्ष कार्यालयांवर दगडफेक केली. यात दाेन्ही पक्षांच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
- भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांना जिल्हा न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यासह आणखी काही गुन्हे दाखल आहेत.

मराठवाडा : जालना, औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांत शांतता
- नारायण राणे अटकनाट्यापूर्वीचे जालन्यातील चार राजकीय गुन्हे वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र फारसे राजकीय गुन्हे दाखल नाहीत.
- औरंगाबादेत २५ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणेप्रकरणी सेना-भाजपवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. जुलै-ऑगस्ट महिन्यांत शहरात आंदोलने, मोर्चे, उपोषणप्रकरणी २५ गुन्हे दाखल आहेत.

नगर : शिवसेना नगरसेवकाची राणेंविरुद्ध तक्रार, गुन्हा दाखल
- शहरातील काेतवाली पाेलिस ठाण्यात २४ ऑगस्टला शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बाेराटे यांनी राणे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
- भादंवि कलम ५००, ५०५, १५३ बी (१) (सी) या कलमानुसार हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अहमदनगर शहरातील काेतवालीचे पाेलिस निरीक्षक राकेश मानगावकर करत आहेत.

विदर्भ यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांत सेनेतर्फे तक्रार
- अकोल्यातील दोन पोलिस ठाण्यांत तर अमरावतीतील एका पोलिस ठाण्यात शिवसेनेने राणंेविरोधात तक्रार केली.
- यवतमाळमध्ये एकही तक्रार नाही, तर बुलडाणा व वाशीममध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खान्देश धुळ्यात १० जणांचे पथक, जळगावात
- राणे यांच्या विरोधात एक तर सेना व भाजप समर्थकांविरुद्ध दोन गुन्हे धुळे शहर पोलिसात दाखल आहेत. भुसावळमध्ये एकही गुन्हा दाखल नाही.
- जळगाव जिल्ह्यात ११ ते २४ ऑगस्ट दरम्यान ४ राजकीय गुन्हे दाखल झाले.

पाच वर्षांत दोन वेळा राजकीय खटले मागे
राजकीय खटल्यात पोलिसांतर्फे कोणती कलमे लावली जातात? त्यांचा अर्थ?

- आंदोलनापूर्वी संबंधितांना पोलिस भादंवि कलम १४९ ची नोटीस देतात. जमावबंदीसाठी ही नोटीस असते.
- यानंतर कलम ३५३ लावून गुन्हा दाखल केला जातो. सरकारी कामात अडथळा आणल्याचे हे कलम आहे.
- पोलिसांना मारहाण झाल्यास आंदोलनकर्त्यांवर कलम ३३७ लावले जाते.
- आंदोलन आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून वेळप्रसंगी यात अधिक कलमे जोडली जातात. गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्तीनुसार पोलिस त्या प्रकरणात कलमे लावतात, अशी माहिती निवृत्त सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.

आत्तापर्यंत राजकीय स्वरूपाचे गुन्हे कधी मागे घेण्यात आले आहेत का?
- पाच वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारने दोन वेळा मंत्रिमंडळात निर्णय घेत राजकीय खटले मागे घेतले आहेत.
- ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय डिसेंबर २० मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानंतर गृह विभागाने १६ डिसेंबर रोजी शासन निर्णय जारी केला. सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान नाही अशा खटल्यांचा यात समावेश करण्यात आला.
- यापूर्वी १ नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता.

दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू : काही तक्रारींनी वाढत नसतो पोलिसांवरील ताण
राजकीय कार्यकर्त्यांनी मागणी केली म्हणून पोलिस अधिकारी गुन्हा दाखल करतात, असे बिल्कुल नसते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यभरात अनेक गुन्हे दाखल झाल्याचे समजते. पण, दहावीस गुन्ह्यांनी पोलिसांवरील ताण वाढेल, अशी स्थिती नसते. पोलिस यंत्रणेचे ते कामच आहे. राणे प्रकरणाला राजकीय रंग आहे. पोलिसांना अशा परिस्थितीला तोंड देण्याची सवय असते. : सुरेश खोपडे, आयपीएस अधिकारी, निवृत्त

बातम्या आणखी आहेत...