आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे, पाचही पालिकेचे कामकाज सुरू

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
कर्मचाऱ्यांनी काल कामबंद आंदोलन केले होते - Divya Marathi
कर्मचाऱ्यांनी काल कामबंद आंदोलन केले होते

कळमनुरी येथील पालिका प्रशासनाच्या दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशा विरुध्द पालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मध्यस्थीनंतर शनिवार (23 एप्रिल)  दुपारपासून पाचही पालिकेचे 800 कर्मचारी कामावर हजर झाले.

औंढा नागनाथ देवस्थानच्या वतीने कळमनुरी शहरासाठी 23 एप्रिल रोजी गरजूंसाठी 500 किट पाठविण्यात आल्या होत्या. मात्र या किट गरजूंपर्यंत पोहोचल्यास नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकाराची उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळमनुरी पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबीत करण्याचे आदेश कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. 21) दिले होते.

जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मागे घ्यावेत या मागणी साठी हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह औंढा नागनाथ व सेनगाव नगरपंचायतीच्या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांनी शुकवारपासून (ता. 22) काम बंद आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनामुळे पाचही पालिकांचे कामकाज ठप्प झाले होते.

त्यानंतर आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, शैलेश फडसे, उमेश कोठीकर, पालिका कर्मचारी संघटनेचे डीपी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पाटील यांनी कोणाच्या पार्श्वभूमीवर ही कर्मचारी धोक्यात घालून काम करत असून त्यांच्या वर होणारे कारवाईचा फेरविचार करावा अशी विनंती जिल्हाधिकारी जयवंशी यांना केली.  त्यानंतर जयवंशी यांनी पालिकेचे अधिकारी व संघटनेची मागणी लक्षात घेऊन पुढील आदेशापर्यंत सदरील कर्मचाऱ्यांचे निलंबन करू नये अशा सूचना कळमनुरी पालिकेला दिल्या आहेत. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी आज दुपारी आंदोलन मागे घेतले असून पाचही पालिकेचे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...