आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदर्स डेलाच आईचा खून:आईच्या खुनानंतर मुलीने विहिरीजवळ लपवला चाकू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदर्स डेलाच आईचा खून करणारी निर्दयी मुलगी व तिच्या बॉयफ्रेंडने दुकानातून नवीन चाकू खरेदी केला होता. आईला मारताना कुणी आणखी मध्ये आले तर त्याचाही काटा काढण्याचा त्यांचा विचार होता. खून केल्यानंतर घटनास्थळापासून लांब जात जुन्या बीड बायपासवरील विहिरीजवळ चाकू लपवून ठेवला. बुधवारी पोलिसांनी मारेकऱ्यांसमक्ष तो जप्त केला.

९ मे रोजी सकाळी आठ वाजता बाळापूर शिवारात सुशीला संजय पवार (३९) यांचा खून करण्यात आला होता. चिकलठाणा पोलिसांनी बारा तासांमध्ये गुन्ह्याची उकल करत सुशीला यांची अल्पवयीन मुलगी, तिची बारा वर्षीय मैत्रीण, मुलीचा प्रियकर दीपक बचाटे (२४) व त्याचा मित्र सुनील मेहर यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने त्यांना बाल समितीसमोर उपस्थित करून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

आरोपींना १३ मेपर्यंत कोठडी : न्यायालयाने दीपक व सुनीलला १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करून पोलिस घटनाक्रम जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्या पथकाने गुरुवारी दोघांना घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. खून करण्यासाठी दीपक व मुलीने नवीन चाकू खरेदी केला होता. तीन दिवसांपासून खुनाचा कट शिजत होता. खून केल्यानंतर अत्यंत शांत डोक्याने दीपकने बीड बायपास जवळील एका विहिरीजवळ चाकू लपवून ठेवला. तोदेखील पोलिसांनी जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...