आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी राजस्थानात महिलेला विकले:पीडितेच्या सुटकेनंतर शहरातील दोघांसह चार एजंट अटकेत

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमध्ये महाराष्ट्रातून महिला, अविवाहित तरुणी विकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पडेगाव येथील महिलेला ३ लाख रुपयांमध्ये विकून शेतकऱ्याशी लग्न लावण्याच्या प्रकरणात एजंट बन्सी मेघवाल (५०), लीलादेवी मेघवाल (४२, दोघेही रा. राजस्थान) तसेच शहरातील हारुण खान नजीर खान (४०) व शबाना हारुण खान (३६) यांना छावणी पोलिसांनी अटक केली.

पडेगावमध्ये दोन मुलांसह राहणारी ३० वर्षीय तस्लिमा (नाव बदललेले) पतीपासून विभक्त राहतात. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या ओळखीच्या शबानाने तिला हॉटेलमध्ये काम असल्याचे सांगून फुलंब्रीला नेले. तेथून मात्र तस्लिमाला पुढचा प्रवासच आठवला नाही. शुध्दीवर आली तेव्हा हॉटेल ओम साईमध्ये तिच्यावर हारुणने बलात्कार करून व्हिडिओ काढले असल्याचे कळाले.

ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला जोधपूरला नेले. तेथे बन्सीलाल, मनोज व महावीर नावाच्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार करत दिनेश भादूसोबत बळजबरीने लग्न लावले. तेव्हा हारुणने विकल्याचे तिला कळाले. तस्लिमाने फेब्रुवारीमध्ये घरातून पळ काढत स्थानिक पोलिस ठाणे गाठले. राजस्थान पोलिसांनी कुटुंबाशी संपर्क साधला. छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांच्याकडे याप्रकरणी तक्रार जाताच त्यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधत तस्लिमाला परत आणण्याची व्यवस्था केली.

बातम्या आणखी आहेत...