आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने शुक्रवारी निधीचा पहिला टप्पा म्हणून २८९ कोटी रुपये दिले. त्यामुळे कामाला गती मिळेल. पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेत झाला आहे. याेजनेचे एकूण बजेट २७४० कोटी ७५ लाख रुपये असून यातील ६८५ कोटी १९ लाख रुपये केंद्र सरकार देणार आहे. त्यापैकी २८९ कोटींचा पहिला हप्ता शुक्रवारी मनपाला मिळाल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. ही रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आवश्यकतेनुसार वर्ग केली जाईल.
मनपाच्या हिश्श्याचा निर्णय अजून नाही : पाणी योजनेची किंमत आता २७४०.७५ कोटींवर गेली आहे. केंद्र सरकारचा २५ टक्के वाटा म्हणजे ६८५.१९ कोटी, राज्य शासनाचा ४५ टक्के म्हणजे १२३३.३४ कोटी रुपये आणि महापालिकेचा ३० टक्के म्हणजे ८२२.२२ कोटी रुपये हिस्सा असेल. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता हे पैसे भरणे अवघड आहे. राज्य शासनाने मनपाचा हिस्सा भरावा अशी विनंती प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याच्या अर्थसंकल्प मांडला. परंतु, महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी लागणारी ८२२.२२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जीवन प्राधिकरणाला दिले २५६ कोटी रुपये समांतर पाणीपुरवठा योजनेचे ३३५ कोटी रुपये महापालिकेकडे पडून होते. यातील २५६ कोटी मनपाने नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.