आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांची माहिती:दोन दिवसांनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला घाटी रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांचा संप मागण्या मान्य झाल्यामुळे अखेर मंगळवारी मागे घेण्यात आला. त्यामुळे बुधवारपासून निवासी डॉक्टर कामावर हजर राहतील, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी दिली. मंगळवारी २७५ निवासी डॉक्टर कामावर हजर होते, तर १७७ डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला होता. संपामुळे दोन दिवस ओपीडीवर परिणाम झाला होता. रुग्ण जास्त तर डॉक्टरांची संख्या कमी होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी केवळ ९४८ रुग्णच ओपीडीत तपासणीसाठी आले हाेते. दिवसभरात ४० पैकी २३ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...