आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन सुरू:दोन महिन्यांनंतर मिळू शकते तीन दिवसांआड पाणी

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळावर ऑक्सिजन पोहाेचला, पण शहरात चौथ्या दिवशी पाणी मिळत नाही, अशी खंत औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी व्यक्त करत मनपाला फटकारले हाेते. त्यानंतर मनपाने येत्या दीड ते दोन महिन्यांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.शहराला जायकवाडीतून पाणीपुरवठा होतो. धरण भरलेले असूनही शहराला चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा हाेताे. उन्हाळ्यात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाताे. आता सहाऐवजी पाचव्या दिवशी पाणी दिले जाते. मनपाने किमान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे.

या याचिकेवर सुनावणीवेळी खंडपीठाने महापालिकेला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. याविषयी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खंडपीठाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी नियोजन सुरू आहे. पाणी साठवण्याची समस्या बिकट आहे. आवश्यकतेपेक्षा जलकुंभांची संख्या आकाराने कमी आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत तीन दिवसांआड पाणीपुरवठा कसा करता येईल याचे नियोजन करावे लागणार आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात विस्कळीतपणा येणार नाही, रात्री किती उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवायचा याचादेखील विचार करावा लागणार आहे. या सर्व बाबी तपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल, त्यासाठी किमान दीड ते दोन महिने लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...