आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजेंडा निश्चित:शहरात दोन दिवस फिरून, प्रेझेंटेशन पाहून समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवणार

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून सुमारे तीन वर्षे काम केलेले सनदी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी औरंगाबाद मनपाचे प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला. ‘प्रत्यक्ष दोन दिवस फिरून मी या शहरातील समस्या स्वत: जाणून घेणार आहे. तसेच अधिकाऱ्यांनी विकासकामे व मनुष्यबळाचे प्रेझेंटेशन दोन दिवसांत करावे. त्या आधारे नागरिकांच्या गरजा व समस्यांवरील उपाय काय याचा प्राधान्यक्रम ठरवणार आहे,’ असा अजेंडा डॉ. चौधरी यांनी मंगळवारी (२ ऑगस्ट) सांगितला.

डॉ. चौधरी सोमवारीच शहरात दाखल झाले आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारी त्यांनी वेरूळ येथे जाऊन घृष्णेश्वराचे दर्शन घेतले व रात्री उशिरा मावळते प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडून पदभार स्वीकारला. मंगळवारी सकाळी पांडेय व डॉ. चौधरी दोघेही मनपाच्यामुख्यालयात हजर होते. पांडेय यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची व त्यांच्याकडील जबाबदारीचा परिचय करून दिला. त्यानंतर मनपा कार्यालयातील सर्व प्रमुख विभागांची दोन्ही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सचिव विभागात अंधार दिसताच डॉ. चौधरी यांनी दिवे लावण्याची सूचना केली. यावर कर्मचाऱ्यांनी येथील लाइटच लागत नसल्याचे सांगितले. अनेक विभागातील भिंतींचे रंग उडाल्याचेही दिसून आले.

त्यावर डॉ. चौधरी यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना लगेच रंगरंगोटीच्या तसेच प्रत्येक विभागाच्या नावांचे फलक लावण्याचीही सूचना केली. पत्रकार परिषदेत डॉ. चौधरी म्हणाले की, २०१५-१६ मध्ये मी औरंगाबादेत जिल्हा परिषद सीईओ म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे या शहराविषयी मला काही प्रमाणात माहिती आहे. पण आता सहा वर्षे उलटल्याने पुन्हा आढावा घेतला जाईल. पहिले दोन दिवस मी शहरात फिरणार आहे. नागरिकांशी चर्चा करून प्रश्न, समस्या जाणून घेतल्या जातील. आरोग्यसेवा, सुविधा दर्जेदार केल्या जातील. गरज पडल्यास नवीन आरोग्य केंद्र सुरू करू. मनपा शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर विशेष भर असेल. यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. स्मार्ट सिटीची कामेही पाठपुरावा करून पूर्ण केली जातील.

चांगल्या कामाला प्रोत्साहन, चुकीला माफी नाही : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात शिस्त ठेवावी. अनावधनाने चूक झाली असेल तर ती समजून घेतली जाईल. पण जाणीवपूर्वक चूक केल्यास माफी नसेल. चांगल्या कामाला प्रोत्साहन दिले जाईल. लोकप्रतिनिधींनी सूचवलेली विकासकामे सर्वांच्या अनुमतीने व पुढाकाराने सोडवली जातील. मला क्रिक्रेट, बॅडमिंटनची आवड आहे. येथील खेळाडूंना चांगले क्रीडांगण उपलब्ध करून दिले जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...