आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या सहा महिन्यांपासून चर्चेतील ३१७ कोटी खर्चाच्या १०३ रस्त्यांच्या निविदा अखेर उघडण्यात आल्या. हे काम स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्यात येणार आहे. यासाठी तीन निविदा काढल्या होत्या. सिडकोतील एजी कन्स्ट्रक्शन कंपनीने १५ टक्के कमी दरात म्हणजे २६९ कोटी ४५ लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ३१७ कोटींतील किमान ४७ कोटी ४५ लाख रुपये शिल्लक राहतील. त्यातून २० नव्या रस्त्यांची कामे करण्याची तयारी होत आहे.
३१७ कोटींतील सर्वाधिक १२३ कोटी ८७ लाखांचा निधी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मध्य मतदारसंघात ४० रस्त्यांसाठी खर्च होणार आहे. या निविदा प्रक्रियेत पहिल्या टप्प्यासाठी एजी कन्स्ट्रक्शनने ११ टक्के सर्वात कमी दराने निविदा दाखल केली. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर, राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रास्ट्रक्चरचा दर अनुक्रमे ३.८५ व ०.०१ टक्के कमी आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी एजीने १५ टक्के कमी दराने निविदा भरली. विक्रम इन्फ्रास्ट्रक्चरने ७.०२ टक्के कमी दराने, राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रास्ट्रक्चरने ०.०१ टक्के कमी दराने निविदा दाखल केली. टप्पा तीनसाठी एजीने १५ टक्के कमी तर पवार-पाटकर कन्स्ट्रक्शनने १० टक्के कमी, राजेंद्रसिंग भांबू इन्फ्रास्ट्रक्चरने ०.०१ टक्के कमी, श्री सत्यसाई इन्फ्रास्ट्रक्चरने ५.१३ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे तिन्ही टप्प्यांचे काम एजीला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१५ टक्के वाचलेल्या पैशातून आणखी २० रस्ते होण्याची शक्यता
फुलंब्री मतदारसंघातील ३ रसो्त्यांसाठी ४.२३ कोटी
आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघातील ३५ रस्त्यांवर ११९.१३ कोटींचा खर्च होणार आहे. आमदार अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघातील २५ रस्त्यांना ३१७ कोटींच्या यादीत स्थान दिले असून त्यावर ७० कोटींचा खर्च होणार आहे. शहराचा काही भाग हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात येतो. त्यातील तीन रस्त्यांवर ४.२३ कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.