आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये काँग्रेस महागाई विरोधात आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारके धोरण व महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. महागाई कमी करण्यात यावी तसेच कृषी व जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी रद्द करण्यात यावा आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे तसेच कृषी उत्पादने व जीवनावश्यक वस्तूंना जीएसटी लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे आर्थिक गणित बिघडले आहे. केंद्र सरकार केवळ मोठ्या उद्योग व्यवसायिकांनाच सवलती देत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांची मात्र मिरवणूक करत आहे. ती त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी अशी मागणी काँग्रेस जिल्हा प्रभारी मुजाहिद खान यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शहरातील तसेच राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते दुपारी बारा वाजता करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये केंद्र सरकार व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मुजाहिद खान, जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, माजी मंत्री अनिल पटेल, नामदेवराव पवार, प्रकाश मुगदिया, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील झाले होते.

बातम्या आणखी आहेत...