आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सामाजिक अत्याचाराच्या विरोधात आक्रमक भूमिका ; अत्याचारविरोधी बैठकीत निर्णय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात १ सप्टेंबर रोजी आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे बैठक झाली. राज्यात सातत्याने शोषित, वंचित, आंबेडकरी समुदायावर जातीय भावनेतून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. सामाजिक न्याय खात्याच्या बाबतीत सरकारचे धोरण उदासीन आहे. शैक्षणिक नाकेबंदी केली जात आहे. अशा असंख्य प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच अशा सामाजिक अत्याचाराविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार होते. या वेळी ज्येष्ठ नेते रमेश खंडागळे, गौतम खरात, गौतम लांडगे, किशोर थोरात, कृष्णा बनकर, अरुण बोर्डे, अमित भुईगळ, सुनील मगरे, बंडू कांबळे, कैलास गायकवाड, जालिंदर शेंडगे, विजय निकाळजे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...